वेळापूर : तारखेला हजर झालेल्यानी न्याय देण्याची मागणी केली असता जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी वेळापूर तालुका माळशिरस येथील वेळापूर मंडलाधिकारी विलास रणसुभे याच्यावर वेळापूर पोलिसात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक वृत्त असे की, वेळापूर पोलीस स्टेशनला फिर्यादी दत्ता मालोजी खुडे (रा. गिरझणी ता. माळशिरस ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वेळापूर मंडलाधिकारी विलास रणसुभे यांच्यासमोर दत्ता मालोजी खुडे, मारुती यदु खुडे, दत्ता मारुती खुडे, विठ्ठल लक्ष्मण खुडे, विष्णू पांडुरंग खुडे, केशव पांडुरंग खुडे, तानाजी रामचंद्र खुडे, (सर्वजण रा. माळेवाडी अकलूज) हे सर्वजण वेळापूर मंडलाधिकारी विलास रणसुभे यांच्या कार्यालयात गेले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हे सर्वजण जमिनीच्या तारखेस हजर राहिले असता, त्यांनी विलास रणसुभे यांच्याकडे आम्हाला रीतसर कायदेशीर न्याय द्या, असे सर्वजण म्हटले असता दत्ता मालोजी खुडे याला वेळापूर मंडलाधिकारी विलास रणसुभे यांनी जातिवाचक शिवीगाळ करून तुम्ही कोणाकडेही जावा, अशा प्रकारची फिर्याद वेळापूर पोलीसात देण्यात आली आहे. याचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू हे करीत आहेत.