रायगड : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ई-पासबाबत मोठी घोषणा केली. सध्या महाराष्ट्रात ई-पासमध्ये सवलत नसेल. केंद्र सरकारने इ पासबाबत नव्या सूचना दिल्या आहेत. मात्र, महाराष्ट्रात ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग पाहता ई-पासची सक्ती कायम राहणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी त्यांनी काही दिवसांनंतर ई-पास धोरणावर पुनर्विचार केला जाईल, असंही नमूद केलं. तो रायगडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. अनिल देशमुख म्हणाले, “केंद्र सरकारने वाहतुकीबाबत काही नवीन मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बोललो आहे.
आपण काही काळ निर्बंध कमी केले. मात्र, त्यानंतर ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढला. सुरुवातीला 3 महिने ग्रामीण भागात कोरोना नव्हता. मात्र, निर्बंध कमी केल्यानंतर संसर्गाचं प्रमाण वाढलं. त्यामुळे सध्यातरी महाराष्ट्रात ई-पासबाबत आहे तेच नियम राहतील. काही दिवसांनी यावर पुनर्विचार केला जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.