नवी दिल्ली : अटल निवृत्तीवेतन योजनेमध्ये एकूण नावनोंदणी संख्या 2.4 कोटीच्या पार गेली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात 17 लाखाहून अधिक अटल निवृत्तीवेतन खाती उघडली गेली आहेत. अटल निवृत्तीवेतन योजना भारत सरकारद्वारे सुरू केली गेली होती, ज्याचे व्यवस्थापन पीएफआरडीए करते. या योजनेंतर्गत 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय खाते उघडू शकतो. या योजनेत बँक शाखा किंवा पोस्ट ऑफिसमधून खाते उघडले जाऊ शकते जिथे ग्राहकांचे बचत खाते आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या योजनेअंतर्गत, ग्राहकांना त्याच्या योगदानाच्या आधारावर वयाच्या 60 व्या वर्षापासून किमान 1000 ते पाच हजार रुपये प्रतिमाह पेंशन मिळते. ग्राहकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या जोडीदारास ही पेन्शन मिळते. दोघेही नसल्यास, नामनिर्देशित व्यक्तीला पेन्शनची रक्कम दिली जाते.
आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान 260 एपीवाय सेवा प्रदात्यांमार्फत 17 लाखाहून अधिक एपीवाय खाती उघडली गेली आहेत. अशाप्रकारे, 20 ऑगस्ट 2020 पर्यंत अटल पेन्शन योजनेच्या ग्राहकांची संख्या 2.4 कोटींच्या पुढे गेली आहे. वर्षानुवर्षे बँक प्रवर्गानुसार, अटल निवृत्तीवेतन योजनेतील अर्जांची संख्या खालीलप्रमाणे आहे.
* अशी आहे वर्गवारी
20 ऑगस्ट 2020 पर्यंत या योजनेच्या एकूण ग्राहकांपैकी जवळपास 73.38 टक्के ग्राहकांनी 1,000 रुपये पेन्शन योजनेचा पर्याय 16.93 टक्के लोकांनी 5,000 रुपयाच्या योजनेचा पर्याय निवडला आहे. एकूण ग्राहकांपैकी 43.52 टक्के महिला ग्राहक आणि 56.45 टक्के पुरुष ग्राहक आहेत. त्याचबरोबर, 52.55 टक्के सदस्य 21 ते 30 वर्षे वयोगटातील आहेत.