मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री संगीता श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे. २५ ऑगस्ट रोजी कोकिलाबेन रुग्णालयात संगीता यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याचे वृत्त ‘टेलीचक्कर’ने दिले आहे. संगीता यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
काही रिपोर्टनुसार, संगीता यांना गेल्या काही दिवसांपासून vasculitis चा त्रास होत होता. काल मंगळवारी (ता. २५ ऑगस्ट )अखेर त्यांचे निधन झाले. संगीता यांनी ‘थपकी प्यार की’, ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ आणि ‘भंवर’ या मालिकांमध्ये काम केले होते.
यापूर्वी ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ मालिकेतील को-स्टार समीर शर्माने मुंबईतील मालाड इथल्या राहत्या घरी आत्महत्या केली. ४४ वर्षीय समीरने गळफास घेऊन आत्महत्या केली. समीरच्या घरातून कोणतीच सुसाइट नोट मिळालेली नाही. ‘ज्योती’, ‘कहानी घर घर की’, ‘लेफ्ट राइट लेफ्ट’, ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या मालिकांमध्ये समीरने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.