मुंबई : महाराष्ट्रात आपलं हक्काचं नवं घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकासआघाडी सरकारने 31 डिसेंबरपर्यंत घर खरदेवरील स्टॅम्प ड्युटीत मोठी कपात केली आहे. सध्या घर खरेदीच्या प्रक्रियेत आकारण्यात येणारी स्टॅम्प ड्युटी 5 टक्क्यांवरुन 2 टक्क्यांवर येणार आहे. त्यामुळे घर खरेदी करु इच्छिणाऱ्या सामान्य नागरिकांना हा मोठा दिलासा मानला जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सरकारच्या स्टॅम्प ड्युटी कमी करण्याच्या या निर्णयाने घर खरेदी करणाऱ्यांमध्ये काहीशी उत्साहाची लाट येऊन आर्थिक घडी पुन्हा बसू शकणार आहे. याच आशेवर सरकारकडून हा निर्णय घेतल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. राज्य सरकारने तात्पुरत्या स्वरुपात ही स्टॅम्प ड्युटी कमी केली आहे.
यानुसार फ्लॅट खरेदी करताना आकारण्यात येणारी स्टॅम्प ड्युटी 5 वरुन 2 टक्क्यांवर आली आहे. ही सूट केवळ 31 डिसेंबरपर्यंत असणार आहे. 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 या दरम्यान हीच स्टॅम्प ड्युटी 3 टक्के होईल. यामुळे मंदावलेला रिअल इस्टेट बाजाराला चालना मिळेल अशी आशा सरकारला आहे.
* यामुळे घेतला निर्णय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आर्थिक व्यवहारांचा वेग प्रचंड मंदावला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांची पगार कपात झाली आहे. त्यामुळे याचा साहजिक फटका बांधकाम व्यवसायालाही बसला आहे. आर्थिक घडी विस्कटल्याने घर खरेदी करणाऱ्यांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे एकूणच बांधकाम व्यवसायावर याचा विपरित परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.