अक्कलकोट : ‘दार उघड उद्धवा… दार उघड’ असे म्हणत तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर मंदिर उघडण्यासाठी आज भाजपाने तासभर घंटानाद आंदोलन केले. मंदिरे उघडण्यासाठी आज शनिवारी राज्यभर भाजपाने घंटानाद केला.
मागील सहा महिन्यांपासून अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर कोरोनामुळे बंद आहे. यामुळे अक्कलकोट येथील कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाला आहे. शासनाने मंदिर वगळता इतर सर्व प्रकारचे ज्या ठिकाणी नागरिकांचे गर्दी होत असते ते सर्व उघडण्यास परवानगी दिली आहे. तर धार्मिक ठिकाणला का ? परवानगी दिले जात नाही, असा सवाल आंदोलनात उपस्थित केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी नायब तहसीलदार राठोड यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी मोतीराम राठोड, शिवशरण जोजन, प्रभाकर मजगे, राजकुमार बंडीछोडे, कयुम पिरजादे, यशवंत धोंगडे, मिलन कल्याणशेट्टी, दयानंद बिडवे, प्रभाकर मजगे, बाळा शिंदे, शिवशरण वाले, अंबणा चौगुले, सुनील गवंडी, निजप्पा गायकवाड, सिद्धय्या स्वामी, बसवंतराव कलशेट्टी, प्रदीप बंदीछोडे, सिद्धाराम टाके, ऋषी लोणारी, कांतू धनशेट्टी, परमेश्वर यादवाड, आनंद खजुरगीकर, नागराज कुंभार उपस्थित होते. आंदोलनस्थळी प्रभारी पोलीस निरीक्षक राजेश देवरे, सपोनि विलास नाळे, पोह सिद्राम धायगोडे, पो ना धनराज शिंदे यांनी बंदोबस्त लावला होता.