पंढरपूर / सोलापूर : मंदिर खुले करण्यासाठी राज्यातील नागरिकांची मागणी वाढत आहे. या लोकभावनेचा आदर करत शासनाने माझेसह मोजक्या लोकांना विठ्ठलाच्या मुख दर्शनाला परवानगी दिली. यामुळे मुख्यमंञ्याचा मी आभारी आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. शासन एस ओ पी नियुक्त करणार असुन याच्या अहवालानंतर मंदिर नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. यासाठी आम्ही आठ दिवस अहवालाची वाट पाहू, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिला.
विठ्ठल दर्शनानंतर मंदिराबाहेर आल्यावर आंबेडकर हे पञकारांशी बोलत होते. आजच्या आंदोलकाकडे राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले होते. अखेर हे आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी शहरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ड्रोन कॅमेरेच्या साहाय्याने शहारातील परिस्थितीवर पोलिस प्रशासन लक्ष ठेवत आहे. यावेळि जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ सागर कवडे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनिल जोशी यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सकाळी आठ वाजल्यापासून आंदोलक जमण्यास सुरुवात झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासन सतर्क झाले होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील पंढरपूरमध्ये दाखल झाले होते. शासनाचे प्रतिनिधि म्हणून आंदोलकांशी चर्चा केली. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. सागर कवडे पो. नि. अरुण पवार हे शिवाजी चौक, मंदिर परिसरातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून होते. कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलीस प्रशासन ड्रोन कॅमेराद्वारे प्रत्येक घटना कैद करीत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर हे सकाळीच पंढरपूरमध्ये दाखल झाले होते. माञ दुपारी बारा वाजेपर्यंत ते आंदोलनस्थळी दाखल झाले नव्हते. यामुळे आंदोलक शिवाजी चौकात भजन आंदोलन चालू होते. जिल्हा प्रशासन आणि प्रकाश आंबेडकरांसह शिष्टमंडळाशी चर्चा सुरु होती. प्रशासन मंदिर दर्शनास जाण्यास मज्जाव करीत होते. तर प्रकाश आंबेडकर आपल्या मंदिर प्रवेशावर ठाम होते.
* ….काय कारवाई करायची ती करा
आम्ही इथे नियम पाळण्यासाठी नाही तर नियम मोडण्यासाठीच आलोय. काय कारवाई करायची असेल ती करा, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. तसेच लोक एकत्र आले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत नाही, हेच आम्हाला दाखवायचंय, असेही ते म्हणाले. मंदिरे खुली करणे ही लोकांची भावना आहे. लोकांच्या भावना बघून सरकारने मंदिरे खुली करावीत, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.