मुंबई : अभिनेता अर्जून कपूर कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचं काही तासांपूर्वीच समोर आलं होतं. त्याबाबत अर्जून कपूरनं स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली होती. सध्या तो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम क्वारंटाईन झाला आहे. दरम्यान आता मलायका आरोरा कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली असून सध्या ती आयसोलेशनमध्ये आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मलायका अरोराला कोरोना झाल्याच्या वृत्ताला तिची बहिणी अमृता अरोराने दुजोरा दिला आहे. सध्या मलायका डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आयसोलेशनमध्ये असून ती योग्य ती खबरदारी घेत आहे. अर्जून कपूर हा मलायका आरोराचा बॉयफ्रेन्ड आहे.
त्यानं आपल्याला कोरोना झाल्याचं स्वतःहून सांगितलं. त्याला काही तास होत नाहीत तोपर्यंत मलायका अरोरा कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. ‘फिल्मफेअर’नं दिलेल्या वृत्तानुसार मलायका आरोरा कोरोना पॉझिटिव्ह आहे.