उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथे उत्तर तालुका शिवसेनेच्या वतीने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणारी अभिनेत्री कंगना राणावतच्या वक्तव्याचा निषेध करून जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
कंगना राणावत विरोधात कडक कारवाई करण्याचे निवेदन उत्तर सोलापूर पोलीस स्टेशनचे सुहास जगताप यांना देण्यात आले. हिंदी चित्रपट अभिनेत्री कंगनाने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. आक्रमक पवित्रा घेत प्रतिमा जाळण्यात आली. जोडेमार आंदोलन करण्यात आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख संजय पौळ, शिवसेना उपजिल्हा प्रमुख विक्रांत काकडे, तालुका प्रमुख शहाजी भोसले, तालुका समन्वयक प्रसाद नीळ,सदाशिव सलगर,अच्युत बाभळे,हुकूमचंद राठोड, सचिन घोडके,विष्णु भोसले, श्रीकांत यलगुंडे,विष्णु माळी,लक्ष्मण मुळे,मोतीराम पवार, अण्णा काळे, तानाजी भोसले,महेश पांढरे,पांडुरंग भोसले, महावीर भोसले,सिद्धेश्वर गरड यांच्यासह उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.