सांगली : कर्नाटकमधील सीमावासियावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मैदानात उतरले आहेत. शिराळ्यात चिखली येथे विश्वास साखर कारखान्याच्या गळीत हंगाम प्रसंगी आज रविवारी त्यांनी हाताला काळ्या फिती लावून कर्नाटक सरकारचा निषेध केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महाराष्ट्रतील राष्ट्रवादीचे सर्व नेते, कार्यकर्ते आज हाताला काळ्या फिती लावून कर्नाटक सरकारचा निषेध करत आहेत. बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव व सीमाभागात 1 नोव्हेंबर रोजी ‘काळा दिवस’ पाळला जात आहे. सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ 1 नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधत कामकाज पाहणार आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष , जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आपल्या हाताला काळी फित बांधून कामकाजाला सुरुवात केली आहे.
* मराठी बांधवांचा आवाज बुलंद करू, दडपशाहीचा धिक्कार करू
बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव व सीमाभागात 1 नोव्हेंबर रोजी ‘काळा दिवस’ पाळला जातो. सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ यंदा 1 नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधत कामकाज पाहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाच्या सर्व पदाधिकारी, युवक, युवती, इतर सेल व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, 1 नोव्हेंबर रोजी आपणही काळ्या फिती बांधत सीमाभागातील मराठी बांधवांना आपला पाठिंबा द्यावा. सीमाभागातील मराठी बांधवांचा आवाज बुलंद करू, दडपशाहीचा धिक्कार करू’ असे म्हणत जयंत पाटील यांनी आवाहन केले होते .