मुंबई : हिवाळ्यातही पाऊस पडत आहे. त्यातच आता कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये आज शनिवारी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर मुंबई, ठाण्यासह उपनगरातही ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान विभागाने 7 ते 9 जानेवारीपर्यंत 12 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात केला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
29 वर्षात प्रथमच असं घडलं पुणे शहराला काल शुक्रवारी दुपारी दोन तास अवकाळी पावसाने झोडपलं. या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच धांदल उडाली. शिवाजीनगर, पाषाण, बालेवाडी, बाणेर, खडकवासला, शिवणे, उत्तम नगर, बिबवेवाडी, औंध, कोथरूड, विश्रांतवाडी, खडकी, वाकडेवाडी, कसबा पेठ, नगररोड, केशवनगर, मुंढवा, खराडी, घोरपडी, वानवडीसह अन्य परिसरात पाऊस पडला, पुण्यात 1951 ते 1980 दरम्यान जानेवारीत एकही दिवस पाऊस पडला नव्हता, अर्स हवामान विभागाने म्हटलंय.
हिवाळ्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून ढगाळ वातावरणासह पावसाची रिपरिप सुरु आहे. गेल्या 24 तासात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर, मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह काही राज्यांमध्ये थंडीचा जोर ओसरला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकण, मध्य मराराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये शनिवारी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणेसह उपनगरातही ढगाळ वातावरण राहणार. तसेच, काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने 7 ते 9 जानेवारीपर्यंत 12 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात केला होता. हवामान विभागाने जारी केलेल्या अलर्टनुसार, औरंगाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाण्यात जोरदार पावसाचा इशारा दिला होता.