मुंबई : भंडाऱ्यातील घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त करत काही निर्णय घेतले आहेत. भंडाऱ्यातील दुर्घटनांसारख्या पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरू ठेवण्याचे आणि अन्य बालकांवरील उपचार तज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देशही दिल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात देशाला हादरावून सोडणारी घटना भंडाऱ्यात घडली आहे. भंडाऱ्यातील शासकीय सामान्य रुग्णालयात या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आग लागल्यामुळे 10 नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व रुग्णालयांचे तात्काळ ऑडीट करण्याचे निर्देश दिले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून भंडाऱ्यातील घटनेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नवजात बाळांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करतो. मला आशा आहे की जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत’ अशी भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली. तर भाजपचे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित देशमुख यांनी सुद्धा या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दु:ख व्यक्त केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही दुःख व्यक्त केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग लागून झालेल्या बालकांच्या मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन अजित पवार यांनी दिले.
‘अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी आपण चर्चा केली असून रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरू ठेवण्याचे तसंच अन्य बालकांवरील उपचार तज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
दरम्यान, या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
* मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.