बंगळुरू : सीमाभागातील हुताम्यांना अभिवादन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानावरून कर्नाटकच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कर्नाटकात उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आंदोलन केलं जात आहे. तर दुसरीकडे त्या राज्याचे गृहमंत्री बसवराज बोंमई महाराष्ट्राला पोकळ धमक्या देत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक – महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी अभिवादनात केला आहे.
मुख्यमंत्री अभिवादन संदेशात कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत. या अभिवचनासह हूतात्म्यांना विनम्र अभिवादन! असे म्हटले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सीमाभागातील हुताम्यांना अभिवादन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानावरून कर्नाटकच्या नेत्यांनी पोकळ धमक्या द्यायला सुरुवात केली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादात बोंमई यांनी सोलापूर, सांगली कर्नाटकात घेऊ असं विधान करून नव्या वादाला तोंड फोडलंय.
याबाबत बंगळुरू येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला, तेव्हा गृहमंत्री बसवराज बोंमई म्हणाले की, कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादावर आमची बाजू कोर्टात सिद्ध झाली आहे, आमच्या राज्याची भूमी आम्ही सोडणार नाही. तर महाराष्ट्रात सोलापूर आणि सांगली कन्नड भाषिकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे ते भाग कर्नाटकात सामाविष्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा निषेध केला आहे. या बाजूची एक इंचही जमीन कोणालाच दिली जाणार नाही, असे येडियुरप्पा यांनी ठाकरेंना ठणकावून सांगितले आहे.