मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज आझाद मैदान येथे पार पडलेल्या शेतकरी मोर्चावर टीका केली आहे. भेंडी बाजारात कुठून आले शेतकरी? या आंदोलनात शेतकरी कमी इतर लोकच जास्त घुसवली आहेत, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. केंद्रातील मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे. पण काही राजकीय पक्ष त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शेतकऱ्यांना पुढे करत आहेत, असा टोलाही त्यांनी केला.
आझाद मैदानात आज शेतकऱ्यांचा विराट मोर्चा पार पडला. या मोर्चाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले होते. मात्र, या मोर्चावरून प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या आंदोलनात लोकं घुसवली आहेत. इथली लोकं शेतकरी म्हणून आंदोलनात घुसली. भेंडीबाजारात कुठून आलेत शेतकरी? असा सवाल दरेकर यांनी केला. आंदोलनाला प्रतिसाद मिळत नसल्यानेच अशा प्रकारची गर्दी गोळा करण्याची महाविकास आघाडीवर वेळ आल्याची टीकाही त्यांनी केली.
या आंदोलनात शिवसेनेचा एकही नेता सहभागी झाला नाही. त्यावरूनही दरेकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. आजच्या आंदोलनाने शिवसेनेला भूमिकाच नाही हे स्पष्ट झालं आहे. आता रोखठोक भूमिका घेणारी शिवसेना उरली नाही, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना मोर्चात येऊ नको म्हणून सांगितलं. पवारांचा हा सल्ला समजायला वेळ आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीच सोडा पण शिवसेनेचा एकही नेता या आंदोलनाकडे फिरकला नाही, असंही ते म्हणाले.
It’s a pity you don’t have a donate button! I’d most certainly donate to this brilliant blog!
I suppose for now i’ll settle for bookmarking and adding your RSS feed to
my Google account. I look forward to brand new updates and will share
this blog with my Facebook group. Talk soon!
Hurrah, that’s whаtt I was exploring for, what a material!
present here at this ԝeblog, thanks admіn oof this web site. https://bchwiki.org/wiki/index.php/User:KimberlyEyler
Can I simply say what a relief to seek out somebody who really knows what theyre speaking about on the internet. You definitely know the way to convey an issue to mild and make it important. Extra folks need to read this and understand this facet of the story. I cant consider youre no more common because you positively have the gift.