कोलकाता : पश्चिम बंगालच्या माजी आमदार लक्ष्मी रतन शुक्ला याने क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचं ठरवलं आहे. शुक्ला याला बंगाल क्रिकेटच्या अंडर-23 टीमचा कोच म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. सहा वर्षांनंतर पुनरागमनचा निर्णय घेतलाय. दरम्यान, शुक्लाने आमदार झाल्यानंतर क्रीडा मंत्री म्हणून काम पाहिलं, पण यावर्षाच्या सुरुवातीला त्याने आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
देशात मोठी जीवीतहानी; वीज पडून 68 जणांचा मृत्यू https://t.co/4zVWQkOpqV
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 12, 2021
बंगालचा माजी कर्णधार आणि ऑलराऊंडर असलेल्या लक्ष्मी रतन शुल्का याने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमधून संन्यास घेतला होता.व्हीव्हीएस लक्ष्मण बंगाल क्रिकेट टीमचा बॅटिंग सल्लागार म्हणून कायम राहणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रजनीकांत यांचा राजकारणाला कायमचा 'रामराम', पक्ष केला बरखास्त https://t.co/xhQFeGDOd0
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 12, 2021
लक्ष्मी रतन शुल्का हे हावडा उत्तर मतदार संघातून आमदार झाले, यानंतर क्रीडा मंत्री म्हणूनही त्याने काम पाहिलं, पण यावर्षाच्या सुरुवातीला त्याने आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. क्रिकेटमध्ये दुसरी इनिंग सुरू करताना शुक्लाने पुन्हा एकदा एकत्र काम करायचं आहे, याची मी वाट पाहत आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
CONGRATS #LaxmiRatanShukla SELECTED AS COACH OF BENGAL UNDER 23 AND MANY MORE TO COME🎉🥳🎉👏🎉 BEST OF LUCK FOR YOUR FUTURE INNINGS.. pic.twitter.com/tmDr9hLPWK
— Abhijit mondal (@AbhijitMondal05) July 10, 2021
* लक्ष्मी रतन शुक्लाची कामगिरी
40 वर्षांचा भारतीय ऑलराऊंडर राहिलेला लक्ष्मी रतन शुक्ला आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली डेयरडेव्हिल्स आणि सनरायजर्स हैदराबादकडून खेळला. याशिवाय त्याने 3 वनडे सामन्यांमध्येही भारताचं प्रतिनिधीत्व केलं. या 3 सामन्यांमध्ये त्याने 18 रन केले आणि 1 विकेटही घेतली. बंगालकडून त्याने 137 प्रथम श्रेणी मॅचमध्ये 6,217 रन केले आणि 172 विकेट घेतल्या. तर 141 लिस्ट ए मॅचमध्ये त्याला 2,997 रन आणि 143 विकेट मिळवल्या. 80 टी-20 मॅचमध्ये शुक्लाला 991 रन करता आले आणि 47 विकेट मिळाल्या.