मुंबई : महाराष्ट्रासाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. तब्बल 48 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल सोमवारी (12 जुलै) एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. नंदूरबार (71), हिंगोली (75), यवतमाळ (22), गोंदिया (63) या चार जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 16, 925 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच परभणी, यवतमाळ, भंडारा जिल्ह्यात शून्य रुग्ण आढळले आहेत.
राजकारणासाठी क्रिकेटमधून निवृत्ती, आता मंत्रीपदाचा राजीनामा देऊन झाला कोच https://t.co/TDerSc74SG
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 12, 2021
काही दिवसांपासून रोज 9 हजारांच्या आसपास रुग्ण वाढत आहेत. सोमवारी 7, 603 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 15 हजार 277 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 27 हजार 756 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.15 टक्के आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बार्शीचे डॉ. कसपटे कॉमनवेल्थ विद्यापीठाच्या डॉक्टरेटने सन्मानित,सीताफळ संशोधनाची जागतिक स्तरावर दखलhttps://t.co/xk9j00kH2n
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 12, 2021
राज्यात सोमवारी 53 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 48 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यूची नोंद झाली नाही. राज्यात सध्या 1 लाख 8 हजार 343 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (71), हिंगोली (75), यवतमाळ (22), गोंदिया (63) या चार जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 16, 925 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
परभणी, यवतमाळ, भंडारा जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर कोल्हापुरात सर्वाधिक 1640 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,41,86,449 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61,65, 402 (13.95 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,82,476 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,654 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
या क्रमांकाची नोट तुम्हाला बनवेल लखपती https://t.co/8SNZTyHxzG
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 12, 2021
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 478 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 701 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,03,077 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 7,120 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 926 दिवसांवर गेला आहे.
सोलापूर : राष्ट्रवादीच्या नगरसेवक पुत्रास पुण्यात केली अटक https://t.co/IDy7oDZoSV
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 12, 2021