मुंबई : मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडून आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे. यानंतर अजित पवार संतापले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे. “नाना पटोले हे नेते किंवा मंत्री नाहीत, ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पटोलेंची भूमिका मविआला कमकुवत करण्याची आहे. महाविकास आघाडीला सुरुंग लावला जातोय”, असं अजित पवार म्हणाले.
आपण स्वबळावर नारा दिल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे ते आपल्यावर पाळत ठेवून असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या आदेशावरुन आपले फोन टॅप केले जातात, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. लोणावळा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला आहे.
दिलासादायक : 48 शहरं- जिल्ह्यांमध्ये कोरोनाने एकही मृत्यू नाही https://t.co/kXSdmJ082j
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 13, 2021
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असूनही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसपूस असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नाना पटोले यांच्यासारख्या छोट्या माणसाच्या आरोपांवर बोलण्याची गरज नाही, असे शरद पवार यांनी म्हटल्याने त्यात आणखी भर पडली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर मी कशाला बोलू : शरद पवार
https://t.co/xJg48jm8Od— Surajya Digital (@SurajyaDigital) July 11, 2021
सरकार एक विचाराने आहे की नाही, हे महत्त्वाचे आहे, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी यावेळी विधानसभा अध्यक्षपदावरही भाष्य केले. ‘आमच्या तीन पक्षांचा निर्णय झाला आहे. विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे होते आणि ते काँग्रेसकडेच राहणार आहे. त्यामुळे कोणीही काही बोलायचा संबंधच येत नाही. आम्हा तिन्ही पक्षांना काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे. त्या निर्णयावर आम्ही कायम आहोत,’ असे शरद पवारांनी म्हटले आहे.
EXCLUSIVE मुलाखत https://t.co/HmqcvPYaNw
— Nana Patole (@NANA_PATOLE) July 12, 2021
पण आता राष्ट्रवादी काँग्रेसने नाना पटोले यांना उत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नाना पटोले यांना जोरदार उत्तर दिले आहे. नाना पटोले यांनी आपल्यावर आपलेच सरकार पाळत ठेवत असल्याचा आरोप त्यांना माहिती नसल्याने केला आहे. नाना पटोले यांनी त्यांच्याच पक्षाच्या माजी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घ्यावी आणि आरोप करावे, असे मलिक यांनी म्हटले आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे.
अनगर गावच्या शिवारात ६६ किलो गांजा जप्त, गांजाची ६५ झाडेही हस्तगत https://t.co/TZMdf7CuJS
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 13, 2021
राज्यात कुठलेही सरकार असले तरी अशाप्रकारे गृहखात्याकडून माहिती गोळा केली जात असते. राजकीय नेत्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या दौऱ्यांवर लक्ष ठेवणे गरजेचे असते. तसेचे हा प्रकार पटोलेंच्या बाबतीतच होतो, असे नाही तर सुरक्षा यंत्रणा सतर्क राहावी यासाठी प्रत्येक सरकारमध्ये असे होत असते. नाना पटोलेंनी काँग्रेसमधील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलून माहिती घ्यावी, माहिती न घेता आरोप करु नये, असा टोलाही मलिक यांनी लगावला आहे.
नाना पटोलेंच्या या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचं सांगितलं जात आहे. नाना पटोले यांनी आपल्याच सरकारवर पाळत ठेवण्याचा केलेला आरोप हा महाविकास आघाडीला सुरुंग लागत असल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती समोर आली आहे. नाना पटोले यांच्यावर अशा कोणत्याही प्रकारची पाळत ठेवण्यात आली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काँग्रेसच्या नेत्यांसोबत बोलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांत नाना पटोले यांच्या सातत्याने आरोप होत असल्यामुळे राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली आहे.