मुंबई : राज्याचे माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नोकर भरतीबाबतची मोठी घोषणा केली. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे गट अ ते क पर्यंतची एकूण 15 हजार 511 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा सोलापूरचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.
सोलापूरची कन्या, नगरच्या सून असलेल्या 'नयना' बनल्या गोंदियाच्या जिल्हाधिकारी
https://t.co/YY60PQUE7G— Surajya Digital (@SurajyaDigital) July 14, 2021
स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येनंतर सरकारला जाग आली आहे. तसा त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. एमपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्त पदांच्या भरतीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच संघ लोकसेवा आयोगाकडून (युपीएससी) दरवर्षी पुढील संपूर्ण वर्षाचे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. त्याच धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षांचेही वेळापत्रक जाहीर करण्याबाबतचे निर्देशही देण्यात आल्याचीही माहिती मंत्री भरणे यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मैत्री आणि लोककार्याचा झरा : राजेशअण्णा कोठे जयंतीविशेष… (ब्लॉग)
https://t.co/3yzrtrVxZi— Surajya Digital (@SurajyaDigital) July 14, 2021
आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागामधील पदभरतीची मागणी होत होती. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग इत्यादी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे. तसेच गट ‘अ’ची 4 हजार 417 पदे, गट ‘ब’ ची 8 हजार 31 पदे आणि गट ‘क’ची 3 हजार 63 पदे अशी एकूण 15 हजार 511 पदे भरण्यास वित्त विभागाने सन 2018 पासून मान्यता दिलेली आहे. त्याअनुषंगाने या पदांचे आरक्षण तपासून पद भरती गतीने राबवण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.
आता इथे राम नाही, असं ज्यादिवशी वाटेल त्यादिवशी बघू – पंकजा मुंडे, …यांचा डाव पूर्ण होऊ द्यायचा नाही, भागवत कराडांना काय म्हणाल्या ?
https://t.co/RS3jc2yNY8— Surajya Digital (@SurajyaDigital) July 13, 2021
उमेदवारांच्या मुलाखतीच्या टप्प्यावर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने एमपीएससी सदस्यांची 4 रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. सदस्यांची ही पदे भरण्यासाठी जुलै अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्याबाबतही बैठकीत निर्देश दिले आहेत. याशिवाय केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यसंख्येत वाढ करण्याच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा झाली. जेणेकरुन भविष्यातील मुलाखती गतीने पार पाडता येतील, असं त्यांनी सांगितलं.
लोकसंख्या प्रस्ताव आणणाऱ्या भाजप खासदाराला किती मुलं? हाच मोठा विनोद, पुन्हा ट्रोल https://t.co/GB8UI57xqE
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 14, 2021