सोलापूर : पोलिसांचा विरोध दडपशाही , राज्य शासनाचे दडपण असतानादेखील सोलापुरातील मोर्चा तुम्ही यशस्वी केलात. यापुढे घटना दुरुस्ती विधेयक आणून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी लढाईला तयार राहा, असे सूचक वक्तव्य मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अनंत जाधव यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केले.
लोकसभेच्या अधिवेशनात 102 व्या घटना दुरूस्तीचे विधेयक आणून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठ पुरावा करा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव, किरण पवार यांच्याकडून माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी जाधव यांच्याकडे पाहून सूचक वक्तव्य केले.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोलापूरमध्ये मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे फलित म्हणून सरकारने मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावेत, यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकांना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बोलावून चर्चा केली. या चर्चेत केंद्रातील मोदी सरकारने सध्या सुरू असलेल्या संसदीय अधिवेशनात 102 वी घटना दुरूस्तीचा विषय घ्यावा,
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
केंद्रीय कायदा मंत्र्यांनी घटनादुरूस्तीबाबत स्पष्टीकरण देवून मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा मार्ग मोकळा करावा तसेच पंजाबराव देशमुख वसतीगृह योजनेबाबत संपूर्ण महाराष्ट्रात मराठा विद्यार्थ्यांसाठीचे वसतीगृह जिल्हाधिकारी किंवा तत्सम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालवण्याबाबत येत्या अधिवेशनात मागणी करावी, आंदोलनादरम्यान मराठा युवकांवर दाखल झालेले गुन्हे रद्द व्हावेत याबाबत चर्चा झाली.
अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सोलापूरमधील मराठा आक्रोश मोर्चा सरकार आणि पोलीसांनी हाणून पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु नरेंद्र पाटील, शहाजी पवार, अनंत जाधव आणि मोर्चाच्या समन्वयकांनी अत्यंत कौशल्याने मराठा आक्रोश मोर्चा यशस्वी करून दाखवला, याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. अनंत जाधव यांना म्हणाले, लढायला तयार रहा, आगामी निवडणुकीत सोलापूर महानगर पालिका आपल्याला ताब्यात ठेवायची आहे. त्याप्रमाणे काम केले पाहिजे असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे याबाबत तसेच सोलापूरमधील विविध विकास कामांच्या बाबत आणि आगामी सोलापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सोलापूरला मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाकडे मागणी करावी, अशा मागण्या जाधव यांनी केल्या.