टेंभुर्णी : पुणे जिल्ह्यात व भीमा खो-यासह उजनी धरण पाणलोट क्षेत्रात ओढ दिलेल्या पावसाने अखेर काल मंगळवारपासून संततधार पडत असल्याने या पावसामुळे आज बुधवारी (दि. २१ ) सायंकाळी सहा वाजता दौंड येथून ८ हजार ४०० क्युसेक्स विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे.
सध्याची पाणी पातळी वजा ३.३४ टक्के पाणीसाठा आहे. येत्या दोन दिवसात उजनी धरण पाणीपातळी मृत साठ्यातून बाहेर येऊन प्लसमध्ये येण्याची आशा आहे. गत वर्षी २० जुलै रोजी उजनी धरण मृत साठ्यातून बाहेर आले होते.
आज बुधवारी सायंकाळी सहा वाजता दौंड येथून ८ हजार ४०० क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत होता. सध्या पाणी पातळी वजा ३.३४ टक्के पाणीसाठा आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
चालू हंगामात उन्हाळ्यात १३ मे रोजी उजनी धरणाची जिवंत साठ्यातून मृत साठ्याकडे वाटचाल चालू झाली होती. मागील वर्षी देखील उजनी धरण १३ मे रोजी मृत साठ्यात गेले होते.
२ जून पासून गेल्या पन्नास दिवसात उजनी धरणात कमी अधिक पावसामुळे १० टिएमसी पाणीसाठा वाढला आहे. उजनी पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने २ जूनपासून उजनी पाणी पातळी वाढण्यास सुरूवात झाली होती. यावर्षी वजा २२. ४२ टक्के इतका पाणीसाठा खाली गेला होता. तर सध्या एकूण ६१. ८४ टिएमसी पाणीसाठा सून वजा १. ७९ टिएमसी पाणीसाठा आहे.
पुणे जिल्ह्यात पावसाची संतधार अशीच सुरू राहिल्यास उजनी धरण दोन दिवसात मृत साठ्यातून बाहेर येण्याची शक्यता असून उजनी शंभर टक्के भरण्याची आशा निर्माण झाली आहे. उजणी धरण पाणलोट क्षेत्रात जून महिन्यापासून २३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
उजनी प्लस होण्याकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. एकदा उजनी प्लस झाली की वर्षभर पाण्याचा प्रश्न मिटतो. सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याची पूर्ण भिस्त या उजनीवर आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील शेतीलाही उजनीचे पाणी आवश्यक असते.