सोलापूर : केंद्र सरकारला ओबीसीच काय देशातील कोणतच आरक्षण ठेवायचं नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं हा अजेंडा तयार केला आहे. त्यावर मोदी सरकार काम करत असून त्यांचे राज्यातील पक्षीय पिलावळ खोटं बोल पण रेटून बोल, अशा पध्दतीनं काम करत असल्याचा आरोप जेष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी केला आहे.
आज सोलापुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कोर्टात टिकला नाही. सरकारकडे जाती निहाय संपूर्ण आकडेवारी उपलब्ध आहे. न्यायालयानं याची मागणी केली. राज्यसरकारनंही आकडेवारी मागितली, पण देण्यास टाळाटाळ केली जात आहे. ही माहिती चुकीची असल्याचं सरकार सांगतयं. पण हा बुध्दीभेद करण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधान याच आकडेवारीनुसार देशातील दारिदय निर्मुलनासाठी उज्वला गॅस सह इतर योजना राबवत असल्याचं सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मध्यंतरी संघ प्रमुखांनी देशात आरक्षण असू नये अशी भूमिका मांडली मात्र अलिकडेच संघाच्या अन्य नेत्यानं आरक्षणाचं समर्थन केलयं. याचं कारण आगामी उत्तर प्रदेश निवडणूका मोदी सरकार ओबीसींची फसवणुक करत आहे आणि त्यांच समर्थन राज्यात फडणवीस, शेलार, चंद्रकांत पाटील यांची टिम करत आहे.
या सर्वांनी समर्थन केलयं. याचं कारण आगामी उत्तर प्रदेश निवडणूका मोदी सरकार ओबीसींची फसवणुक करत आहे आणि त्यांच समर्थन राज्यात फडणवीस, शेलार, चंद्रकांत पाटील यांची टीम करीत आहे. या सर्वांनी केंद्राला लिहलेली पत्र आणि राज्यात देत असलेली माहिती यात मोठी तफावत आहे. ते केंद्राच्या बचावासाठी खोटेपणा करीत असल्याचा आरोपही विचारवंत प्रा. हरी नरके यांनी केला आहे.