मुंबई : माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कंटाळून राष्ट्रवादीचे दिग्गज नेते, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे पक्ष सोडला आहे. जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे आणि काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत आलेल्या उपऱ्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रमाणाच्या बाहेर हस्तक्षेप वाढला आहे. आव्हाडांना कंटाळून आपण राष्ट्रवादी सोडली, असे गावडे यांनी म्हटले. त्यानंतर गावडे हे शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल झाले आहे.
जितेंद्र आव्हाड आणि आमदार शशिकांत शिंदे या दोन राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली आहे. आव्हाड आणि शिंदे तसेच राष्ट्रवादीत बाहेरून आलेल्या उपऱ्या नेत्यांचा हस्तक्षेप वाढत असल्याने कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
● सुप्रिया सुळेंचे दुर्लक्ष
दोन वर्षांपूर्वीपासून आपण राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे उपऱ्या नेत्यांच्या हस्तक्षेपाविरोधात तक्रारी करत आहोत. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर विष्णुदास भावे सभागृहात राष्ट्रवादीच्या मेळाव्यातही हे मी सांगितले होते.
परंतु राजकीय परिस्थितीमध्ये काही सुधारणा झाली नाही. उपऱ्या नेत्यांचा हस्तक्षेप कमी झाला नाही म्हणून कंटाळून पक्ष सोडत असल्याचे अशोक गावडे म्हणाले आहेत. शरद पवार यांच्या विषयी आदर होता आणि यापुढेही राहील, असै सांगितले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ शरद पवार लक्ष घालायला गेले, झाले उलट
शरद पवार हे ठाण्याच्या दौऱ्यावर येऊन ठाणे परिसरात राष्ट्रवादी वाढीसाठी “अधिक” लक्ष घालायला गेले आणि त्यांच्याच पक्षाचा नवी मुंबईच्या शहराध्यक्ष फुटले असे घडले आहे.
शरद पवार यांनी नुकताच ठाण्याचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत ठाण्यात पूर्वी सुसंस्कृत नेतृत्व कसे होते, याची काही उदाहरणे सांगितली होती. या उदाहरणांमधून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांची नावे वगळली होती. त्याचवेळी ते ठाण्यामध्ये जुने राजकीय वैभव परत आणण्यासाठी आपण अधिक लक्ष घालू, असे ते म्हणाले होते.
ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व जितेंद्र आव्हाड करतात. शरद पवारांच्या ठाणे दौऱ्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना राजकीय बूस्टर डोस मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली होती. पण हा डोस औटघटकेचा ठरला. त्या ठिकाणाहून गळतीस सुरूवात झालीय.
गेल्या काही वर्षांत थातूरमातूर आंदोलने वगळता पक्षाचा एकही मोठा कार्यक्रम झालेला नाही. श्रेष्ठींतील अजित पवार यांची सिडकोतील शासकीय बैठक वगळता एकही मोठा नेता शहरात फिरकला नाही. वास्तविक, मुंबईनंतर एमएमआरडीए क्षेत्रातील सर्वांत सक्षम महापालिका म्हणून नवी मुंबईकडे पाहिले जाते. आता शरद पवार यांनीच पक्षबांधणीकडे लक्ष घातल्याने काय सकारात्मक बदल होतील, अशी अपेक्षा निर्माण झाली होती.
□ मुंबईतील ताकद झाली कमी
ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकल्यापासून पक्षाची नवी मुंबईतील ताकद अगदीच तोळामासा झाली आहे. एकेकाळी पक्षाचे महापालिकेवर एकहाती वर्चस्व होते. मात्र, त्यात गणेश नाईक यांच्या ताकदीचा प्रभाव होता. परंतु, पाच-सहा नगरसेवक वगळता पक्षाचे सर्वच नगरसेवक नाईक यांच्यासाेबत भाजपमध्ये गेल्याने पक्षाला लागलेली घरघर आजही कायम आहे.
गणेश नाईक यांच्या टीमने राष्ट्रवादी सोडल्यानंतर सुरुवातीला जितेंद्र आव्हाड यांनी माथाडी कामगारांची मोठी व्होट बँक असलेल्या नवी मुंबईत ताकद वाढविण्यासाठी मेहनत घेतली. कार्यकर्त्यांना नैतिक बळ दिले होते. त्यांच्यासोबत माथाडी नेते शशिकांत शिंदे आणि उरणहून नवी मुंबईत येणारे प्रशांत पाटील यांना निरीक्षक नेमले. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे-पाटील समर्थक अशोक गावडे यांना विधानसभेसाठी उभे केले. त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी बऱ्यापैकी मते घेतली होती.