नवी दिल्ली : समाजवादी पार्टीचे माजी नेता, राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन झालं आहे. ते 64 वर्षांचे होते. त्यांना उपचारासाठी सिंगापूर इथल्या दवाखान्यात भरती करण्यात आलं होतं. उपचादारम्यान त्यांचं निधन झालं आहे. 2013 मध्ये किडनीचा आजार झाल्यानंतर त्यांच्यावर दुबईत उपचार करण्यात आले होते. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी पुन्हा राजकीय कामांना सुरुवात केली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज अमरसिंह यांनी ट्वीटरवर स्वातंत्र्यसेनानी बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली होती आणि लोकांना ईदच्याही शुभेच्छा दिल्या होत्या. उत्तर प्रदेशच्या अतिशय महत्त्वाच्या नेत्यांमध्ये अमर सिंह यांचं नाव होतं. अमर सिंह यांच्या राजकीय प्रवासाची सुरूवात 1996 मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर झाली होती. समाजवादी पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांची राजकीय सक्रीयता थोडी कमी झाली होती. एकेकाळी उत्तर प्रदेशातील ते मोठे नेते होते.
समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांच्यासोबत त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते. मात्र नंतर त्यामध्ये त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. अमिताभ बच्चनसह इतर मोठ्या अभिनेत्यांबरोबर देखील त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. अमर सिंह यांच्यामुळे समाजवादी पार्टीला मोठा फायदा झाला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी अमिताभ बच्चन यांची माफी मागितली होती.
अमरसिंह बराच काळ आजारी होते व जवळपास सहा महिन्यांपासून सिंगापूरच्या माउंट एलिझाबेथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत फक्त त्यांची पत्नी होती. मुंबई मिररने दिलेल्या माहितीनुसार, अमर सिंह हे आयसीयूमध्ये होते. यापूर्वी 2013 मध्ये अमर सिंह यांचे मूत्रपिंड निकामी झाले होते. अमर सिंह यांचा जन्म 27 जानेवारी 1956 रोजी आजमगड येथे झाला होता.
अमरसिंह यांचे प्रोफाइल पाहता असे दिसून येते की, आजारी असूनही ते सोशल मीडियावर बर्यापैकी अॅक्टिव होते. समाजवादी पक्षाचे कट्टर नेते असलेल्या अमर सिंह यांचा मार्च महिन्यात एक व्हिडिओ चर्चेत होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूची बातमी ही अफवा असल्याचे सांगितले होते. आपले पूर्वीचे अनुभव सांगताना ते म्हणाले की, त्यांची तब्येत यापूर्वीदेखील खालावली होती, परंतु प्रत्येक वेळी मृत्यूशी लढा देऊन ते परत आले. माञ यावेळी त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली