सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस वाढत असलेला विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज मंगळवारी महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. पंढरपूर शहारात सात दिवासांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यावर आज सोलापूर येथे पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत घोषणा केली आहे.
पंढरपूर शहरात 7 ते 13 ऑगस्ट या दरम्यान लॉक डाऊन करण्यात येत असल्याची घोषणा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली आहे. दूध ,मेडिकल वगळता कडक संचारबंदी असणार आहे. पंढरपूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी लॉकडाऊन लागू केला जावा, असा प्रस्ताव प्रशासनाकडून पाठवण्यात आला होता. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील , सोलापूर चे आयुक्त पी . शिवशंकर , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले की , पंढरपूर आणी परिसरामध्ये येत्या 6 तारखेच्या मध्यरात्री 12 पासून म्हणजे 7 तारखेच्या पहाटेपासून 13 च्या मध्यरात्री पर्यंत लॉकडाऊन लागू होणार आहे. प्रदक्षिणा मार्ग आणि जास्त प्रादुर्भाव असलेल्या परिसरातील लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. परिस्थिती पाहून डाऊनमध्ये तीन दिवसापर्यंत वाढही होऊ शकते. केवळ दूध , हॉस्पिटल , मेडिकल स्टोअर्स सुरू राहणार आहेत.