नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने नागरी सेवा परीक्षा 2019 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत प्रदीप सिंह यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. तर जतिन किशोर आणि प्रतिभा वर्मा यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले आहे. या परीक्षेतून पात्र ठरलेल्या एकूण 829 मेदवारांची विविध पदांवरील नियुक्त्यांसाठी शिफारस करण्यात आली आहे.
महाराष्ट्राची नेहा भोसले देशात पंधराव्या रँकवर आहे. मात्र यात सगळ्यांचे लक्ष वेधले ते पुण्याच्या जयंत मंकलेनं.
महाराष्ट्रातील जयंत मंकले या अंध विद्यार्थ्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेत 143वा क्रमांक पटकावला आहे. याआधी जयंतने 2018 मध्येही लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. मात्र त्यावेळी त्याचा 937 वा क्रमांक होता. त्यामुळे त्यांनी दोन वर्ष अथक परीश्रम करून पुन्हा परीक्षा दिली, आणि यावेळी त्यांना यश आले. 2018 मध्ये यश न मिळाल्यामुळे एक वर्ष जयंत नैराश्यातही होता. मात्र अभ्यास करून जिद्दीनं यंदा जयंतने 143 वा क्रमांक मिळवला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अंतिम निकाल https: //www.upsc.gov.in/ यावर पाहता येईल.
या परीक्षेतून जे पात्र ठरले आहेत त्या उमेदवारांच्या तात्पुरत्या नियुक्त्यांची यादी यूपीएससीने जाहीर केली आहे. लेखी परीक्षा सप्टेंबर 2019 मध्ये घेण्यात आली होती. तर फेब्रुवारी- ऑगस्ट 2020 दरम्यान व्यक्तिमत्व चाचणी घेतली होती. त्याचा अंतिम निकाल जाहीर केला आहे.
गुणवत्तेनुसार उमेदवारांची भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलिस सेवा आणि केंद्रीय सेवा (ग्रुप ए आणि ग्रुप बी) या ठिकाणी नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या सेवा परीक्षेतून IAS, IPS आणि IFC, भारतीय टपाल सेवा, भारतीय टपाल सेवा, यूपीएससी नागरी सेवांद्वारे भारतीय व्यापार सेवा यासह इतर सेवांसाठी निवड केली जाते. ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. यात प्रारंभिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे असतात. मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाते.