मुंबई : सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणात ईडीच्या चौकशीत रियाने धक्कादायक खुलासे केले आहेत. सुशांतच्या खात्यातून करोडो रुपयांची अफरातफर केल्याच्या आरोपाखाली रिया चक्रवर्तीची ईडीने आठ तास चौकशी केली. यामध्ये रियाने सुशांतच्या सीएचेही नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. रियाने सुशांतचेच नाहीत तर सुशांतच्या मोठ्या बहिणीच्या एफडीवरही डल्ला मारल्याचे समोर आलंय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या साऱ्या पार्श्वभूमीवर ईडीने रिया आणि तिच्या भावाला चौकशीला बोलावले होते. रियाची 8 तास आणि तिच्या भावाची दुसऱ्या दिवशी 18 तास चौकशी करण्यात आली. यामध्ये रियाने ईडीला सीएचे नाव घेत त्यांचाही यात सहभाग असल्याचे सांगितले आहे. सुशांतने त्याच्या मोठ्या बहिणीच्या नावे साडेचार कोटी रुपयांची एफडी ठेवली होती. मात्र, रिया सुशांतच्या आयुष्यात आल्यानंतर दोन्ही सीए आणि तिच्या भावाने मिळून त्यातील अडीच कोटी रुपये गायब केले. यामुळे सुशांतच्या बहिणीच्या एफडीमध्ये केवळ दोन कोटी रुपयेच राहिले आहेत, असे सुत्रांनी सांगितले.
रियाने ईडीला सांगितले की, मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा लेखाजोखा पाहणाऱ्या दोन चार्टड अकाऊंटटना दोन कोटी 65 लाख रुपये देण्यात आले.
याशिवाय ईडीला सुशांतची कंपनीचे व्यवहार, बँक खाती आणि त्यावरील रक्कमेचे अनेक संदिग्ध व्यवहार आढळले आहेत. यावर रियाला विचारले असता तिने उत्तर देणे टाळले आहे. यामुळे सुशांतच्या वडिलांनी लावलेले आरोप खरे ठरू लागले आहेत. सुशांतच्या वडिलांनी सुशांतच्या खात्यात 17 कोटी रुपये होते असा दावा केला होता. त्यावर सीएने हा दावा खोडला होता. आता ईडीच्या चौकशीमध्ये सारेकाही समोर येणार आहे