सांगली : सांगली जिल्ह्यात शनिवारी मनपा विभागात 180, शहरी भागात 9, ग्रामीण भागात 63, नवीन रुग्ण आढळून आले. तब्बल 251 रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या 4 हजार 448 वर पोहोचली आहे. पॉझिटिव्ह पैकी आज अखेर बरे झालेले रुग्ण संख्या 1 हजार 938 आहे. आज उपचारा खाली 2 हजार 374 रुग्ण आहेत. जिल्ह्यातील 136 रुग्णांचा आज अखेर मृत्यू झाला आहे.
मनपा क्षेत्रातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. आज अखेर मनपा क्षेत्रातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 2 हजार 722 आहे. शहरी भागातील 303, ग्रामीण भागातील रुग्णसंख्या 1 हजार 423 आहे. आज rt-pcr टेस्ट 1 हजार 34 घेण्यात आल्या. त्यापैकी 175 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. अँटीजन टेस्ट 573 घेण्यात आल्या त्यापैकी 86 रुग्ण पॉझिटिव्ह आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तालुका निहाय शनिवारची पॉझिटिव्ह रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे – आटपाडी 15, जत 3, कडेगाव 6, कवठेमहांकाळ 7, मिरज 21,शिराळा 7,तासगाव 3,वाळवा 7, सांगली 133, मिरज 47 अशी आहे.
शनिवारच्या अहवालातील मृतांमध्ये बावची येथील 80 वर्षांचा पुरुष,कासेगाव येथील 45 वर्षांचा पुरुष, सांगली येथील एकूण 49, 70, 59 वर्षांचे पुरुष, व 76 वर्षांची महिला, मिरज येथील 27, 65, व 73, वर्षांच्या महिला असे आहेत. पॉझिटिव्हपैकी 173 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत .
* आज अखेर तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आटपाडी 187,जत 196, कडेगाव 89, कवठेमहांकाळ 163, खानापूर 75,मिरज 349,पलूस 154,शिराळा 218, तासगाव 121, वाळवा 174, मनपा 2 हजार 722.
* कोल्हापुरात दिवसात हजार
कोल्हापूर जिल्ह्यात कोरूना चा कहर एका दिवसात 1 हजार 14 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. 12 जणांचा मृत्यू झाला. कोल्हापूर शहर 312, नगरपालिका क्षेत्र 230, करवीर 106, हातकणंगले 153 पॉझिटिव्ह.
सातारा व कोल्हापूर जिल्हा कोरोना आढावा बैठक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत आज रविवारी कराडमध्ये होणार आहे.