सोलापूर : सोलापूर ग्रामीणमध्ये धक्कादायक माहिती आली आहे. सोलापूर शहरातला कोरोना कसाबसा आटोक्यात येत असताना ग्रामीण भागातील कोरोना हाता बाहेर जात आहे.
आज रविवारच्या अहवालानुसार नऊ मृत्यू तर तब्बल 371 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 117 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात एकूण बाधित 5 हजार 557, मृत्यू 162 तर कोरोनामुक्त 3 हजार 160 अशी संख्या झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यत 42 हजार 775 व्यक्तींची कोरोना टेस्ट असून आतापर्यंत 11 तालुक्यांमध्ये 5 हजार 557 रुग्ण आढळले आहेत. रविवारच्या अहवालानुसार बार्शी, अक्कलकोट आणि पंढरपूर तालुक्यातील प्रत्येकी दोघांचा, द. सोलापूर, मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ग्रामीणमध्ये 162 जणांचा मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे दोन दिवसांत 18 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या आता 162 झाली आहे. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर आणि रॅपिड ऍन्टीजेन टेस्टला सुरुवात केल्यापासून ग्रामीण भागातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर समोर येऊ लागली आहे. दररोज सरासरी अडीचशे ते तीनशे रुग्णांची भर पडत असल्याने शहराच्या तुलनेत ग्रामीण भागाची चिंता वाढली आहे.
अक्कलकोट 551, बार्शी एक हजार 148, करमाळा 237, माढा 411, माळशिरस 422, मंगळवेढा 190, मोहोळ 347, उत्तर सोलापूर 399, पंढरपूर 961, सांगोला 176 आणि दक्षिण सोलापुरात 715 रुग्ण आढळले आहेत.
रविवारी सर्वाधिक 95 रूग्ण पंढरपूर तालुक्यात आढळले तर 52 रुग्ण पंढरपूर तालुक्यात आढळले. आतापर्यंत ग्रामीणची रूग्ण संख्या 5 हजार 556 झाली असून 162 जणांचा मृत्यू झाला आहे.