पुणे : सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी होत असताना त्यांच्या नावाला विरोध करणारे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे हे समितीत कसे ? त्यांना स्मारक समितीतून वगळा,’ अशी मागणी धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवींचे स्मारक धनगर समाजाच्या लोकवर्गणीतून करण्याचा घाट कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी घातला आहे. या प्रकरणातील त्यांचे कामकाज संशयास्पद असल्याने त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारक हे सरकारी निधीतून झाले पाहिजे,’ अशी भूमिका ढोणे यांनी मांडली आहे. या प्रकरणी आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.