पुणे : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात महाराष्ट्र सरकारने अहिल्यादेवींचे भव्य स्मारक उभा करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे अभिवचन खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना दिले आहे. या बाबत शासकीय पातळीवर लवकरच निर्णय होईल,’ अशी माहिती सक्षणा सलगर यांनी माध्यमांना दिली.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची सक्षणा सलगर यांनी भेट घेतली. त्यांनी अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात शासकीय खर्चातून अहिल्यादेवींचे स्मारक उभा करण्याबाबत निवेदन दिले आहे. सुप्रिया सुळे यांना दिलेल्या निवेदनात सक्षणा सलगर यांनी म्हटले आहे की,”पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतर्गत एकूण 118 महाविद्यालये आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्या महाविद्यालयातून 65000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यापीठात एकूण 5 विभाग आहेत. विद्यापीठाकडे सुमारे 480 एकर जमीन आहे. विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक लोकवर्गणीतून करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र, महाविकास आघाडीच्या सरकारने हे स्मारक उभा करावे,’ अशी अपेक्षा सलगर यांनी व्यक्त केली आहे.
“महाराष्ट्रात सर्व विद्यापीठात महापुरुषांचे पुतळे, स्मारके सरकारने उभा केले आहेत. मग, अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक लोकवर्गणीतून का करायचे? अहिल्यादेवी यांचे स्मारक सरकारने उभा करावे,’ अशी मागणी सक्षणा सलगर यांनी केली आहे.
या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात महाराष्ट्र सरकारने अहिल्यादेवींचे भव्य स्मारक उभा करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे अभिवचन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांना दिले आहे.