अमरावती : “राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकार गंभीर नाही. राज्यातील कृषी खातं झोपलं आहे की काय”, असा सवाल उपस्थित करत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला घरचा अहेर दिली आहे. शेतीप्रश्नावर महाविकास आघाडीतील नेते आमने-सामने आले आहेत.
विदर्भात सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. सध्या सोयाबीन पीक संकटात सापडलं आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार परिसरात सोयाबीन पिकावर अज्ञात रोग आला आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी खुद्द राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करुन त्वरित नुकसानग्रस्त झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश बच्चू कडू यांनी दिले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बच्चु कडू यांनी, ‘ ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे. त्याची लगेच पाहणी करुन पंचनामे केले जाणार आहे. पंचनामे केल्यानंतर तातडीने मदत दिली जाणार आहे,’ असे सांगितले. तर, पुढं त्यांनी शेतकऱ्यांच्या सद्याच्या परिस्थितीवरून सरकारलाच खडेबोल सुनावले. “राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकार गंभीर नाही. आधी बियाणे बोगस निघालं. “राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकार गंभीर नाही. आधी बियाणे बोगस निघालं. आता पिकावर रोग येतात आहे. त्यामुळे राज्यातील कृषी खातं झोपलं आहे की काय” असा सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.
राज्यमंत्री बच्चु कडू यांनी केलेल्या आरोपांवर आता कृषीमंत्री दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कृषी विभाग हे शेतकऱ्यांच्या प्रति गंभीर नाही, अशी कोणतीही परिस्थिती नाही. ज्या गोष्टी गोष्टी समोर येत असतात त्याचा निपटारा करण्याचे काम हे कृषी विभागाकडून केले जात आहे’, असा खुलासा भुसेंनी केला आहे.पूढे त्यांनी, ‘राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या काही ज्या सूचना आहे. त्यांचा विचार केला जाईल. बच्चू कडू यांनी जे आरोप केले त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल’, असंही स्पष्ट केले.
* तसे पाहिले तर दोघेही शिवसेनेचे
बच्चू कडू हे सलग चौथ्यांदा निवडून आलेले अपक्ष आमदार आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. २०१९ मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कडू यांनी शिवसेनेच्या कोट्यातून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्यांच्या राज्यमंत्री पदाची शपथ ३० डिसेंबर २०१९ रोजी घेतली आहे. त्याचवेळी दादा भुसे यांनी शिवसेनेकडून कृषीमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे दोघेही शिवसेनेचे प्रतिनिधित्व करीत आहेत.