टेंभुर्णी : भारतीय संविधान हे देशासाठी पविञ ग्रंथ आहे. या संविधानाच्या प्रतिवर अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे याने देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने निवेदनाद्वारे केली आहे.
प्रवीण तरडे याने त्याच्या घरी गणपतीची स्थापना केलेली आहे. परंतु ती करीत असताना त्याने जाणून-बुजून खोडसाळपणाने पवित्र ग्रंथावर म्हणजेच संविधानावर गणपतीची स्थापना केली आहे. यातून भारतीयांचा व संविधानाचा अपमान झाला आहे. यामुळे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माढा तालुका वंचित आघाडीचे वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या मागणीचे निवेदन टेंभुर्णी पोलीस स्टेशचे सहाय्य पोलीस निरीक्षक शितोळे यांना आज रविवारी देण्यात आले. या वेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा महाचिव -विशाल नवगिरे, राहुल चव्हाण, उपाध्यक्ष आण्णासाहेब वाघमारे, शहराध्यक्ष विशाल मिसाळ, प्रसिद्धीप्रमुख रणजित गायकवाड, ॲड. जुगल खरात, वामन अडसूळ, राजू वाघमारे उपस्थित होते.