प्रयागराज : सोशल मीडियात हिंदू देव-देवतांवर अश्लील टिप्पणी करणाऱ्या युट्यूबर हिर खान हिला पोलिसांनी अटक केली आहे. प्रयागराज पोलिसांनी युट्यूबर हिरा खान हिच्याविरोधात खुलदाबाद पोलीस स्टेशनमध्ये आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.
एसओजी आणि खुलदाबाद पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत युट्यूबर हिर खानला तिच्या घरातून अटक केली. खुल्दाबाद पोलीस ठाण्यात तिची चौकशी सुरू आहे. युट्यूबवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये हिरा खान हिने हिंदू देवी-देवतांवर अभद्र आणि अश्लील भाषेत टिप्पणी केली होती. यानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या आणि तिच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, वादग्रस्त व्हिडीओ अपलोड केल्यानतंर हिर खान पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी प्रयागराज येथील आपल्या नातेवाईकांकडे लपून बसली होती. मात्र, पोलिसांनी २४ तासांत तिचा शोध घेतला आणि अटक केली, असे प्रयागराजचे एसएसपी अभिषेक दीक्षित यांनी सांगितले.