सोलापूर : सोलापूर शहरातील नवीवेस ते भैय्या चौक मार्गावर असलेल्या पाटील चाळीतील दोन मजली इमारत कोसळून चार मजूर जखमी झाल्याची घटना आज शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. घटनेतील जखमी मजूर हे मध्यप्रदेशातील असल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणाचा मृत्यू झाला नाही.
तहलिय्या वसुनिया, निलेश फुलसिंग बोरीया, जिया समशु वसुनिया (रा़ तिघेही तोरोनिया राज्य – मध्यप्रदेश) असे जखमी झालेल्या मजूराचे नावे आहेत. जखमींवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सोलापूर शहरात सध्या सर्वत्र स्मार्ट सिटी अंतर्गत विविध ठिकाणी कामे सुरू आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नवीवेस ते भैय्या चौक दरम्यान असलेल्या पाटील चाळीत ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे़ या कामासाठी जेसीबी व पोकलेन लावण्यात आले असून या यंत्राच्या व्हायब्रेशनमुळे व पावसाच्या पाण्याने भिजलेली जुनी असलेली दोन मजली इमारत अचानक कोसळली.
या घटनेची माहिती मिळताच सोलापूर महानगरपालिकचे उपायुक्त पंकज जावळे, अग्निशामक दलाचे प्रमुख केदार आवटे, नगरसेवक चेतन नरोटे, विनोद भोसले आदी घटनास्थळी दाखल झाले होते. लोकप्रतिनिधी लोकांच्या मदतीना जखमीना रुग्णालयात हलवले.