सांगली : सांगली जिल्ह्यात रविवारी मनपा विभागात 172 नवीन रुग्ण, शहरी विभागात 28 नवीन रुग्ण, आणि ग्रामीण भागात 55 नवीन रुग्ण आढळून आलेत. जिल्ह्यातील रुग्ण संख्येत रविवारी तब्बल 255 ची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या 4 हजार 706 वर पोहोचली आहे. दुर्दैवाने सांगलीतील कोरोनाग्रस्तांची पाच हजाराकडे वाटचाल सुरु आहे.
दिलासादायक बाब म्हणजे एकूण बाधितांपैकी एकूण 2 हजार 54 जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी जिल्ह्यात उपचारा खाली 2 हजार 507 रुग्ण आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंत 145 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी 116 रुग्ण कोरोना मुक्त ही झालेले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मनपा क्षेत्रातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 2 हजार 902, शहरी भागातील 331, ग्रामीण भागातील 1हजार 473 अशी आहे. शनिवारी rt-pcr टेस्ट 859 घेण्यात आल्या पैकी 128 रुग्ण आढळले. अँटीजन टेस्ट 658 घेण्यात आल्या पैकी 134 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
तालुका निहाय नवीन रुग्णसंख्या – आटपाडी 2, जत 3, कडेगाव 1, कवठेमहांकाळ 4, मिरज 28, शिराळा 5, तासगाव 5, वाळवा 12, सांगली 123, मिरज 49, पलूस 3, खानापूर 20, अशी आहे. रविवारच्या अहवालातील मृतांमध्ये मिरज येथील 40, 75 वर्षांचे पुरुष, व 65 वर्षांची महिला. सांगली येथील 71, 72, व 77 वर्षांचे पुरुष. कुपवाड येथील 70 वर्षांचे पुरुष. तासगाव येथील 67 व 65 वर्षाचा पुरुष, असा समावेश आहे. पॉझिटिव्हपैकी 200 रुग्ण चिंताजनक अवस्थेत आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
* तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्णसंख्या –
आटपाडी 188, जत 199, कडेगाव 90, कवठेमहांकाळ 165, खानापूर 95, मिरज 375, पलूस 157, शिराळा 223,तासगाव 126,वाळवा 186, मनपा 2 हजार 902 अशी आहे.
* 500 अब्युलन्स खरेदी करणार : आरोग्यमंत्री
कोल्हापूर व सातारा येथील कोरोना स्थितीबाबत रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कराड येथे आढावा बैठक आयोजित केली होती.