सांगली : शिराळा शहरांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून शहरामध्ये गणेश उत्सव सणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी नगरपंचायतीने शहराच्या प्रमुख ठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. नागरिकांनी याचा पुरेपूर वापर केला असून हा नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी झाला आहे.
शिराळा येथील घुमट वस्ती- होळीचे टेक येथील कृत्रिम गणेश मूर्ती विसर्जन तळ्याचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश पाटील, उपनगराध्यक्ष कीर्तिकुमार पाटील, नगरसेवक उत्तम डांगे, सीमा कदम यांच्या उपस्थितीत झाले. नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश पाटील यांनी या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले.
शिराळा (घुमट वस्ती- होळीचे टेक ) येथील कृत्रिम तळ्यात गणेश मूर्ती विसर्जन स्थळाचे उद्घाटन झाले. उपनगराध्यक्ष किर्तिकुमार पाटील, नगरसेवक उत्तम डांगे, सीमा कदम, अर्चना गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य अधिकारी पाटील यांनी शिराळा शहरांमध्ये कृत्रिम गणेश विसर्जन स्थळांचा पहिल्यांदाच प्रयोग नगरपालिकेने केला असल्याचे सांगितले. शहरातील नागरिकांनी व महिलांनी याचा पुरेपूर वापर करून प्रदूषण टाळण्याचे आवाहन केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महिलांनीही गौरीचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तळ्याचा वापर करून शहरांमध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला. शहराचा कोरोनाच्या आजारापापसून संरक्षण होणे हा यामागचा हेतू असून या उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्यांना शिराळा नगरपंचायतमार्फत गौरवपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
यावेळी सुभाष इंगवले, जयसिंग गायकवाड, श्रीरंग गायकवाड, संभाजी गायकवाड, आनंदा नलवडे, शंकर कदम, माणिक कदम, सुवर्णा नलवडे, शीतल गायकवाड, अनुराधा शिंदे, नीलम गायकवाड, नंदा नलवडे, दर्शन डांगे, टी एम गायकवाड, महेंद्र कांबळे, बासूद्दीन मुल्ला, काजल गायकवाड, दुर्गा गायकवाड, श्रद्धा गायकवाड, वेदिका गायकवाड, स्वरांजली नलवडे उपस्थित होते.